Miss & Mrs. दादर

423

>> संजीवनी धुरी-जाधव, नमिता वारणकर

सौंदर्यस्पर्धा… यामुळे आत्मविश्वास दुणावतो… स्वसौंदर्याची जाणीव होते आणि सामाजिक बांधिलकीचीही. या सर्व गोष्टी लक्षात घेऊन ‘ दैनिक सामना’च्या विशेष सहकार्याने ‘मिस ऍण्ड मिसेस दादर’ सौंदर्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.

तरुणींपासून ज्येष्ठ महिलांचा ठसकेदार रॅम्पवॉक… एकापेक्षा एक सौंदर्यवती…त्यांच्या चेहऱयावर असलेला कमालीचा आत्मविश्वास…आपल्या बुद्धिकौशल्याने परीक्षकांच्या प्रश्नांना दिलेली उत्तरे… असा सौंदर्य आणि फॅशनचा अनोखा मिलाफ दादरमध्ये राहणाऱया आणि दादरसाठी नावीन्यपूर्ण कार्य करू पाहणाऱया तरुणी, महिलांसाठी ‘मिस ऍण्ड मिसेस दादर’ या अनोख्या सौंदर्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. दादरच्या तरुणी आणि महिलांच्या कलागुणांना उत्तम व्यासपीठ मिळावं यासाठी ‘दैनिक सामना’च्या विशेष सहकार्याने ही स्पर्धा भरवण्यात आली होती. यंदाचं या स्पर्धेचं पहिलंच वर्ष असूनही दादरकरांनी या स्पर्धेला भरघोस प्रतिसाद दिला. यामध्ये ध्वनी जैन हिने ‘मिस दादर’, तर निशा नराळे यांनी ‘मिसेस दादर’ हा किताब जिंकला.

गेल्या दोन महिन्यांपासून वेगवेगळय़ा प्रकारच्या टास्कमधून चाळीस महिलांची निवड करण्यात आली होती. या चाळीसजणींची चार विविध गटांत विभागणी केली. व्यक्तिमत्त्व विकास आणि सामना वुमन्स क्लबच्या माध्यमातून महिलांच्या कलागुणांना वाव मिळाण्यासाठी या स्पर्धेला प्राधान्य दिले गेले. त्याचाच एक भाग म्हणून ‘दैनिक सामना’ या स्पर्धेत माध्यम प्रायोजक म्हणून सहभागी झाले. त्यामुळे स्पर्धेत घेतलेल्या स्पर्धंकांचे विशेष कौतुक ‘सामना’चे समूह व्यवस्थापक राजेंद्र भागवत यांनी केले.

मुंबईचा सांस्कृतिक वारसा लाभलेले दादर. शैक्षणिक, सांस्कृतिक, सामाजिक, ऐतिहासिक अशा अनेक घडामोडी जिथे सतत घडत असतात. आज या स्थानकाची ओळख फक्त यापुरतीच मर्यादित राहिली नसून ग्लॅमर, फॅशन यासोबतच उत्तम विचार जपणाऱया शिवाय स्वतंत्र कला आणि बुद्धिमत्तेच्या बळावर यश मिळवलेल्या मुली येथे पाहायला मिळतात. यातूनच मनाली कामत यांच्या संकल्पनेतून ‘मिस ऍण्ड मिसेस दादर’ ही स्पर्धा साकार झाली. त्यांच्या मते सौंदर्यस्पर्धेत फक्त मॉडेल, अभिनेत्रीच भाग घेऊ शकतात का? आपण सामान्य माणसे का सौंदर्यस्पर्धेत भाग घेऊ शकत नाही? प्रत्येकालाच सौंदर्याची आवड असते. त्यामुळे दादरमधील सर्व वयोगटातील हौशी महिलांसाठी ही संधी उपलब्ध केली होती.

सौंदर्य म्हणजे केवळ बाह्य सौंदर्य नव्हे, तर व्यक्तीचं वागणं, बोलणं, चालणं, हजरजबाबीपणा, व्यक्तिगत कौशल्यं हे गुणही सौंदर्यात भर घालतात. त्यामुळे या स्पर्धेत भाग घेतलेली प्रत्येक स्त्र्ााr वेगळी होतीच, शिवाय ती आत्मविश्वासाने स्पर्धेला सामोरी जात होती. प्रत्येकीची स्वप्नं वेगवेगळी होती. प्रत्येकाला समाजासाठी काहीतरी करायचे होते. कोणाला वाहतूककोंडी सोडवायची होती, कोणाला समुद्राचे खारे पाणी गोडे पाणी करून पाणीटंचाईवर मात करायची होती, झाडे लावून पर्यावरणाला हातभार लावायचा होता, तर कोणाला सामाजिक कार्यात खारीचा वाटा घेऊन सहभागी व्हायचे होते.

यावेळी ज्येष्ठ अभिनेत्री वंदना गुप्ते, अभिनेत्री शिल्पा तुळसकर, शर्मिष्ठा राऊत, माध्यम प्रतिनिधी सौमित्र पोटे यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले. परीक्षकांनी विचारलेले प्रश्नही विचारांना उद्युक्त करणारे होते. त्यात दादर स्वच्छ करण्यासाठी जादूची छडी दिली तर बदल कसा कराल, तुम्हाला दान द्यायला सांगितले तर काय द्याल आणि का, वाहतुकीचे नियम पाळत नाही त्यांच्यासाठी काय करावे, न्ंावरा बेस्ट फ्रेण्ड होऊ शकतो का, शिवाजी पार्क सायलेण्ट झोन करावे की करू नये, काय वाटतं, आजी, आई आणि मुलगी या तीन नात्यांमध्ये काय फरक आहे, पैसा महत्त्वाचा की कामाचे समाधान… अशा एकापेक्षा एक वैशिष्टय़पूर्ण प्रश्नांना सौंदर्यस्पर्धेत भाग घेतलेल्या स्त्र्ायांनी समर्पक उत्तरे दिली.

फक्त सौंदर्य स्पर्धा नाही…
मुली, नवविवाहीता, आई, आजी या स्पर्धेत सहभागी झाल्या होत्या. याचे वैशिष्टय़ असे की, ही केवळ सौंदर्य स्पर्धा नव्हे, तर महिलांच्या कलागुणांना सर्व स्तरांतून वाव मिळावा, त्यांना समाजात मानाने वावरता येण्याबरोबरच समाजासाठीही नावीन्यपूर्ण कार्य करण्याची संधी मिळावी या उद्देशाने ‘मिस ऍण्ड मिसेस दादर’चे आयोजन करण्यात आले होते.

[email protected]

आपली प्रतिक्रिया द्या