अकबर यांच्यावर बलात्काराचा आरोप

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

‘मी-टू’ प्रकरणात महिला पत्रकारांनी लैंगिक शोषणाचे आरोप केल्यानंतर केंद्रीय परराष्ट्र राज्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागलेले ए. जे. अकबर हे आणखी अडचणीत आले आहेत. 1994 मध्ये अकबर यांनी लैंगिक शोषण केले. माझ्यावर बलात्कार केला असा गंभीर आरोप महिला पत्रकार पल्लवी गोगोई यांनी केला आहे.

पल्लवी गोगोई सध्या अमेरिकेतील ‘नॅशनल पब्लिक रेडिओ’च्या चीफ बिझनेस एडिटर आहेत. 23 वर्षांपूर्वी 1994 मध्ये अकबर यांनी केलेल्या बलात्काराच्या घटनेची माहिती त्यांनी ‘वॉशिंग्टन पोस्ट’मध्ये लेख लिहून दिली आहे. अकबर यांनी मात्र आपण पल्लवीशी सहमतीनेच शरीरसबंध ठेवल्याचा दावा केला आहे.

पत्नीने केला अकबर यांचा बचाव
अकबर यांच्या बचावासाठी त्यांची पत्नी मलिका पुढे आली आहे. 23 वर्षांपूर्वी पल्लवीमुळे आमच्या कुटुंबात कलह निर्माण झाला होता. पल्लवी उघडपणे माझ्या पतीशी लगट करायची. एकदा आमच्या घरी पार्टीत अकबर आणि पल्लवी जवळ येऊन डान्स करत होते. तिथेच माझा आणि अकबर यांच्यात वाद झाला होता. पल्लवी का खोटे बोलते यामागचे कारण मला माहीत नाही असे मलिका यांनी म्हटले आहे.

अकबर म्हणाले, सहमतीने संबंध होते!
– पल्लवी गोगोई यांचे आरोप खोटे आहेत. आमच्या दोघांत सहमतीने संबंध होते. नंतर सहमतीनेच आम्ही वेगळे झालो असे एम. जे. अकबर यांनी म्हटले आहे.
– पल्लवी खोटे बोलत आहे. संबंधांना दोघांचीही सहमती होती. पल्लवीबरोबरच्या संबंधांमुळे पत्नी आणि माझ्यातील संबंधही ताणले गेले होते. काही महिन्यांतच मी या प्रकरणाला पूर्णविराम दिला. आम्हा दोघांना ओळखणारे याबाबत सांगू शकतील असे अकबर म्हणाले.