राष्ट्रीय जनता दलाचे (RJD) सर्वेसर्वा आणि बिहारचे माजी मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव यांचे निकटवर्तीय आणि माजी आमदार अरुण यादव यांच्यावर सक्तवसुली संचलनालयाने (ED) मोठी कारवाई केली आहे. ED ने मनी लॉण्ड्रिंग प्रकरणात अरुण यादव यांची जवळपास 25 कोटींची संपत्ती जप्त केली आहे. याआधी ED ने याप्रकरणी अरुण यादव यांच्या घरावर छापेमारी केली होती. फेब्रुवारीमध्ये ED ने शोधमोहीम राबवली होती. पाटणाच्या दानापूर परिसरात राबडी देवी यांच्या नावाचे चार फ्लॅट अरुण यादव यांच्या पत्नी किरण देवी या नावावर हस्तांतरित करण्यात आले आहेत.
बेहिशोबी मालमत्ता बाळगल्याच्या आरोपांशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणाच्या तपासाचा एक भाग म्हणून ED ने फेब्रुवारी 2024 मध्ये माजी राजदचे आमदार अरुण यादव, त्यांची पत्नी किरण देवी आणि काही इतरांच्या घरावर छापेमारी केली होती. ED ने 2024 मध्ये राजदचे आमदार आणि त्यांची पत्नीविरोधात मनी लाँडरिंग प्रतिबंध कायदा(पीएमएलए) अंतर्गत अपराधित गुन्हा दाखल केला होता.
ED ने या तपासाअंतर्गत अरुण यादव आणि त्याच्या कुटुंबातील काही सदस्यांच्या जबाबावरून दाखल केले होते. सोबत ED ने त्यांच्या परिवाराचे सदस्य आणि किरण दुर्गा कॉन्ट्रॅक्टर्स प्रायव्हेट लिमिटेड संपत्ती, कागदपत्रे आणि बँक खात्याची माहिती घेतली होती. याआधी केंद्रीय तपास यंत्रणेने वेगवेगळी पथके मागच्या वर्षी मे महिन्यात आणि यावर्षी जानेवारी महिन्यात त्यांच्या अगियाव गावचे घर आणि दानापूर येथील फ्लॅटची झाडाझडती घेतली होती.
ED ने आरोप केला आहे की, माजी आमदार यांनी आपली बनावट कंपनी किरण दूर्गा कॉन्ट्रॅक्टर्स प्रायव्हेट लिमिटेडच्या माध्यमातून मा माराचिया देवी कॉम्प्लेक्समध्ये फ्लॅट खरेदी केली होता. अरुण यादव राजदचे सुप्रिमो लालू प्रसाद आणि त्यांच्या कुटुंबीयांचा समावेश असलेल्या नोकरीसाठी जमीन घोटाळा प्रकरणात अरुण यादव देखील केंद्रीय तपास यंत्रणांच्या चौकशीच्या फेऱ्यात आहेत.