लोकांचा सर्वाधिक विश्वास वृत्तपत्रातील जाहिरातींवरच; 82 टक्के लोकांची पसंती, ‘हॉर्वर्ड’च्या अहकालातील निष्कर्ष

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी सोशल मीडियासह इंटरनेटवर अनेक हटके जाहिराती धुमाकूळ घालीत असल्या तरी लोकांचा अजूनही विश्वास मात्र वृत्तपत्रातील जाहिरातींवरच असल्याचे ‘हॉर्कर्ड बिझनेस रिव्ह्यू’च्या सर्वेक्षण अहवालातून समोर आले आहे. या सर्वेक्षणात तब्बल 82 टक्के लोकांनी वृत्तपत्रातील जाहिरांतींना पसंती दर्शवली आहे.

गेल्या काही वर्षांपासून डिजिटल मार्केटिंगला पसंती दिली जात आहे.  त्यामुळे पारंपरिक जाहिरातीच्या माध्यमांकडे दुर्लक्ष होत असल्याचे बोलले जाते. मात्र ‘हॉर्कर्ड बिझनेस रिव्ह्यू’च्या सर्वेक्षणात वृत्तपत्रे, टीव्ही आणि रेडिओवर सर्वाधिक विश्वास ठेवत असल्याचे समोर आले आहे. यामध्ये वृत्तपत्रातील जाहिरातींवर लोकांचा सर्वाधिक म्हणजे 82 टक्के विश्वास आहे. दरम्यान, वृत्तपत्रांच्या या विश्वासार्हतेमुळेच आपली 100 टक्के विक्री इंटरनेटवर करणाऱया कंपन्याही आता वृत्तपत्रे, टीव्ही  व रेडिओ यासारख्या पारंपरिक माध्यमांवर होणारा खर्च आगामी वर्षभरात 11.7 टक्क्यांनी वाढवणार आहेत.

काय सांगते सर्वेक्षण
  • 45 लोक डिजिटल जाहिराती पाहतच नसल्याचे ‘हब स्पॉट’च्या सर्वेक्षणात समोर आले आहे.
  • 57 टक्के लोकांनी डिजिटल जाहिरातींना नापसंती दर्शवली आहे.  त्यामुळे संबंधित ब्रँडबात लोकांच्या मनात नकारात्मक भाव तयार होतात.
  • लोकांना आकर्षित करून घेण्यात डिजिटल माध्यमांपेक्षा वृत्तपत्रे सर्वोच्च स्थानी आहेत. वृत्तपत्रे, टीव्ही, रेडिओ डिजिटल चॅनलच्या तुलनेत प्रभावी आहेत.