अल्पवयीन मुलास वेश्या व्यवसाय करण्यास भाग पाडणाऱ्या तृतीय पंथीयास बेड्या

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अल्पवयीन मुलाला मुलींचे कपडे घालून त्याला परपुरुषासोबत बळजबरीने शारीरिक संबंध ठेवण्यास भाग पाडणाऱ्या एका तृतीयपंथी याला गुन्हे शाखेने बेड्या ठोकल्या आहेत.

बाबू आयनल खान ऊर्फ बाबू गुरू ऊर्फ बाबू हिजडा (30) असे त्या आरोपीचे नाव आहे. आरोपीने अल्पवयीन मुलाचे अपहरण करून त्यास जबरदस्तीने तृतीयपंथी बनविले व बालकास लोकल ट्रेनमध्ये स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी भीक मागण्यास प्रवृत्त केले. इतकेच नाही तर त्या अल्पवयीन बालकास मुलींचे कपडे घालून पुरुष ग्राहकांसोबत शरीर संबंध ठेवण्यास भाग पाडले. हा किळसवाणा प्रकार समोर येताच शिवाजी नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर गुन्हे शाखा युनिट-6 च्या पथकाने समांतर तपास सुरू करून आरोपी बाबू याचा शोध सुरू केला. तो ठाण्याच्या कोपरी येथे राहत असल्याने पोलिसांनी तेथे पाळत ठेवली. मात्र पोलिसांची दिशाभूल करून तो अन्य साथीदारांसह मोटारीने मुंबईच्या दिशेने पळत होता. मात्र पोलीस पथकाने त्याचा पाठलाग करून ट्रॉम्बे येथील पांजरापोळ येथे पकडले.