
कोरोनाशी लढण्यासाठी व्यापक जनजागृतीची गरज असल्याचे ओळखून या मोहिमेत मुंबईच्या डबेवाल्यांनी पुढाकार घेतला आहे. संपूर्ण मुंबई शहर, उपनगरे, ठाणे, नवी मुंबईत आपली सेवा पोहोचवणारे डबेवाले जनजागृती मोहिमेत खारीचा वाटा उचलणार आहेत. सरकारच्या आरोग्य खात्याने का इतर स्वयंसेवी संस्था, डॉक्टरांनी जनजागृतीची पत्रके आमच्याकडे सोपवावीत, आम्ही सेवाभावी कृत्तीने ती घरोघरी पोहोच करू, अशी तयारी डबेवाल्यांनी दाखवली आहे.
देशात कोरोनाचे रुग्ण वाढताहेत. मुंबईत मोठय़ा प्रमाणाकर गर्दी असते, पर्यटकांची कर्दळ असते. त्यामुळे विषाणूला केळीच रोखण्यासाठी जनजागृती गरजेची आहे. सरकारच्या आरोग्य यंत्रणेकर याचा ताण पडेल. त्यामुळेच आम्ही स्कत;हून जनजागृती मोहिमेत सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे, असे डबेवाल्यांच्या संघटनेचे कार्याध्यक्ष रघुनाथ मेदगे यांनी सांगितले.
आरोग्य यंत्रणेने कोरोनापासून सावधगिरी कशी बाळगावी, यासाठी छापलेली पत्रके किंवा खासगी डॉक्टर वा स्कयंसेवी संस्थांचा जनजागृती संदेश पोहोचकण्यासाठी आम्ही तयार आहोत. आम्ही ती पत्रके प्रत्येक डब्यासोबत कार्यालयांपर्यंत पोहोचकू तसेच घरोघरीही जनजागृती करू. आमचे मोठे नेटवर्क आहे. त्यामुळे सरकारला याचा नक्कीच फायदा होईल, असे मेदगे म्हणाले.
आमचा हा वडिलोपार्जित व्यवसाय मुंबईकरांच्या कृपेने अर्थात त्यांचा आमच्या सेवेवर विश्वास असल्यामुळे शंभरहून अधिक वर्षे टिकून आहे. त्यामुळे आपल्या ग्राहकांच्या आरोग्याची काळजी घेणे हे आम्ही आमचे कर्तक्य समजतो. – रघुनाथ मेदगे, कार्याध्यक्ष,
मुंबईचा डबेवाला संघटना
मुंबईच्या डबेवाल्यांचे जवळपास 7 हजारांहून अधिक सभासद आहेत. पश्चिम रेल्केकर चर्चगेट ते विरार आणि मध्य रेल्के मार्गावर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसपासून कल्याण तसेच हार्बरवर पनवेलपर्यंत हे डबेवाले सेवा देतात.































































