
देशभरातील टोलनाक्यावर वाहनांसाठी बंधनकारक करण्यात आलेल्या फास्टॅगची मुदत आता 15 डिसेंबरपर्यंत वाढवण्यात आली आहे. आधी ही मुदत 1 डिसेंबर होती. त्यामुळे वाहनचालकांना आता दिलासा मिळाला आहे.
टोलनाक्यांवरील गर्दी कमी व्हावी यासाठी 1 डिसेंबरपासून फास्टॅग बंधनकारक करण्यात आले होते. मात्र वाहनचालकांमध्ये याबाबत पुरेशी जनजागृती न झाल्याने आणि फास्टॅग मिळत नसल्याने मुदत वाढवण्याची मागणी जोर धरू लागली होती. त्यानुसार आता ही मुदत 15 डिसेंबरपर्यंत वाढवली असल्याचे महामार्ग प्राधिकरणाकडून सांगण्यात आले आहे.





























































