फोन करताच 20 मिनिटांत ऍम्ब्युलन्स हजर, पवई आयआयटीच्या विद्यार्थ्यांची अॅम्ब्युलन्स सेवा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पवई येथील आयआयटी मुंबईच्या विद्यमान आणि माजी विद्यार्थ्यांनी ‘हेल्पनाऊ’ ही खासगी अॅम्ब्युलन्स सेवा सुरू केली आहे. गरीब नागरिक, पोलीस आणि सरकारी कर्मचाऱयांसाठी ही सेवा मोफत पुरवली जाणार असून अन्य नागरिकांना माफक दरात उपलब्ध आहे. हेल्पलाईनवर फोन करताच 15 ते 20 मिनिटांत अॅम्ब्युलन्स हजर होते.

आयआयटी मुंबईतील विद्यार्थ्यांनी आतापर्यंत 30 हजारपेक्षा अधिक गरजवंतांना ही सेवा पुरवली आहे. आयआयटी मुंबईत शेवटच्या वर्षाला शिकणारे आदित्य मक्कर आणि शिखर अगरवाल तसेच माजी विद्यार्थी व्यंकटेश अमृतवार यांनी ही सेवा सुरू केली आहे. मुंबई, पुणे, दिल्ली आणि बंगळुरू या शहरांमध्ये त्यांची ही सेवा उपलब्ध आहे.
मुंबईत सध्या ‘हेल्पनाऊ’च्या 350 अॅम्ब्युलन्स कार्यरत आहेत. कोरोनाचे रुग्ण वाढू लागल्याने हेल्पनाऊची 8899889952 ही हेल्पलाईन आता सतत बिझी असते. आंतरराज्यीय सेवाही दिली जाते. प्रत्येक ट्रीपनंतर अॅम्ब्युलन्सचे निर्जंतुकीकरण करण्यात येते. आपात्कालीन परिस्थिती कशी हाताळायची याचे प्रशिक्षण अॅम्ब्युलन्सच्या कर्मचाऱयांना देण्यात आले आहे. सीपीआर, प्रथमोपचार ते देऊ शकतात.

ऑक्सिजन असलेली अॅम्ब्युलन्स, व्हेंटिलेटर असलेली कार्डिएक अॅम्ब्युलन्स तसेच शववाहिनी अशा तीन प्रकारच्या अॅम्ब्युलन्स उपलब्ध आहेत. मृतदेह वाहून नेण्यासाठी आईसबॉक्सचीही सुविधा शववाहिनीत उपलब्ध आहे. रुग्णासाठी बेड कोणत्या रुग्णालयात उपलब्ध होईल याची माहिती देणारी यंत्रणाही ‘हेल्पनाऊ’च्या टीमकडे आहे.