अनाथ बालकांसाठी मुंबई इंडियन्सची आनंदसफर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाइन , मुंबई

 मुंबई इंडियन्स संघाने आपल्या यंदाच्या आयपीएल जेतेपदानंतर मुंबईतील अनाथ मुलांसाठी एका आनंद सफरीचे आयोजन केले होते. दादर शिवाजी पार्क येथून निघालेल्या या सफरीत सहभागी बालकांना मुंबईचे समुद्रकिनारे आणि महत्त्वाची प्रेक्षणीय स्थळे दाखवण्यात आली. सहभागी मुलांसाठी झुंबा डान्स, गिफ्ट्स आणि खाऊचे वाटप करण्यात आले. प्रत्येक मुलाला मुंबई इंडियन्ससोबतचा ग्रुप फोटो भेट म्हणून देण्यात आला. अनाथ मुलांच्या चेहऱयावर खुललेले हास्य पाहून आम्ही धन्य झालो अशी प्रतिक्रिया मुंबई इंडियन्सच्या खेळाडूंनी या सफरीनंतर व्यक्त केली.