मुंबई महापालिकेचा ‘प्राईड ऑफ मुंबई’ पुरस्काराने गौरव; कोरोना काळात मुंबईकरांना दिल्या दर्जेदार आरोग्य सुविधा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरोना काळात मुंबईकरांना महापालिकेने दिलेल्या उत्तम आणि दर्जेदार आरोग्य सुविधांची दखल घेऊन राज्यपाल भगतसिंह कोशारी यांच्या हस्ते मुंबई महानगरपालिकेला प्राईड ऑफ मुंबई पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. उपमहापौर अॅड. सुहास वाडकर यांनी हा पुरस्कार स्वीकारला.

एसएमई चेंबर ऑफ इंडिया आणि महाराष्ट्र औद्योगिक व आर्थिक विकास असोसिएशनच्यावतीने देण्यात येणारे इंडिया एसएमई एक्सलन्स पुरस्कार तसेच प्राईड ऑफ महाराष्ट्र पुरस्कार राज्यपाल कोश्यारी यांच्या हस्ते राजभवनमध्ये देण्यात आले. कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी तत्काळ आणि आपत्कालीन वैद्यकीय सेवा पुरवण्यासाठी मुंबई महापालिकेने अतिशय महत्त्वाची भूमिका बजावली. कोरोनाविरोधात महापालिकेने पहिल्यापासून आक्रमकपणे भूमिका घेत मुंबईकरांसाठी आरोग्य सुविधा उभ्या केल्या. जम्बो सेंटर्स, ऑक्सिजन सुविधा, लसीकरण पेंद्रे उभारली. कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱया लाटेवर यशस्वीपणे मात केल्यावर आता मुंबईत तिसरी लाटही नियंत्रणात आहे. महापालिकेच्या या संपूर्ण कामाची दखल घेत मुंबई महापालिकेला हा पुरस्कार देण्यात आला. या वेळी त्रिपुराचे माजी राज्यपाल डॉ. डी.वाय. पाटील व एसएमई चेंबर आणि महाराष्ट्र औद्योगिक व आर्थिक विकास असोसिएशनचे अध्यक्ष चंद्रकांत साळुंखे उपस्थित होते.