
मुंबईत सोमवारी करोनाचे आणखी 17 रुग्ण आढळले आहेत. या रुग्णांवर कस्तुरबा, राजावाडी आणि एच.बी.टी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. सोमवारी आढळलेल्या 17 रुग्णांपैकी 10 रुग्ण हे कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाच्या निकटचा संपर्कात आल्यामुळे लागण झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे लागण झालेल्या देशातून प्रवास करून आलेल्या नागरिकांनी स्वतःला किमान 14 दिवस क्वारेंटाईन करून घ्यावे, लक्षणे दिसणाऱ्यांनी इतरांच्या संपर्कात येऊ नये, असे आवाहन पालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.






























































