पुण्यात तरुणांच्या खूनाचे सत्र सुरूच, कोंढव्यात तरुणाचा दगडाने ठेचून खून

प्रातिनिधिक फोटो

कोंढव्यातील पार्थिग्राउंड जवळील परिसरात एका तरुणाचा दगडाने ठेचून खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. अद्याप तरुणाची ओळख पटलेली नाही. माहिती मिळताच पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. याप्रकरणी कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कोंढव्यात पार्थि ग्राउंडजवळ पाण्याची टाकी आहे. सकाळी काहीजण फिरण्यास गेले असता त्यांना रक्ताच्या थारोळ्यात एका तरुणाचा मृतदेह दिसून आला. त्यांनी तात्काळ नियंत्रण कक्षाला माहिती दिली. त्यानंतर कोंढवा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यावेळी एका तरुणाचे डोके व चेहरा दगडाने ठेचला असल्याचे दिसून आले. तरुणाची ओळख पटलेली नाही. दरम्यान, दोन दिवसांपूर्वीच नवले ब्रिजजवळ एका तरुणाचा खून केल्यानंतर त्याचे हात-पाय दोरीने बांधून पोत्यात मृतदेह टाकून दिला होता. त्याचीही ओळख पटलेली नाही. त्याचा तपास सुरू असताना आता आणखी अनोळखी तरुणाच्या खूनाचा प्रकार समोर आला आहे. यामुळे शहरात दशहत पसरली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या