डोक्यात वार करून मोठ्या भावाचा खून, नगरमधील घटनेने खळबळ

सख्ख्या छोट्या भावानेच मोठ्या भावाचा खून केल्याची घटना नगर शहरातील सावेडी उपनगर भागातील सपकाळ चौक येथे घडली. सोपान मुळे असे खून झालेल्या मोठ्या भावाचे नाव असून, छोटा भाऊ आरोपी शुभम उर्फ बंड्या मुळे याला पोलिसांनी अटक केली आहे.

सोपान आणि शुभम या भावांमध्ये रात्री जोरदार भांडणे झाली होती. यावेळी छोटा भाऊ शुभम याने सोपान याच्या डोक्यात धारदार शस्त्राने वार केला. यात सोपान गंभीर जखमी झाला. त्याला उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. याबाबत माहिती मिळताच तोफखाना पोलिसांनी आरोपी शुभम उर्फ बंड्या मुळे यासह ताब्यात घेतले. त्याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.