व्यापार्‍याची 28 लाख 59 हजारांची फसवणूक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी। नगर

सावेडी परिसरातील कांदा व्यापाऱ्यांचा विश्‍वास संपादन करुन पाथर्डी येथील तिघांनी कांद्याच्या गोण्याची परस्पर विल्हेवाट लावून कांदा व्यापाऱ्यांची 28 लाख 59 हजार 242 रुपयांची फसवणूक केली. ही घटना केडगाव परिसरातील नेप्ती कांदा मार्केट येथे .23 एप्रिल 2018 ते 12 जानेवारी 2019 दरम्यान घडली.

येथील कांदा व्यापारी नितीन लक्ष्मणराव ताठे (रा.पंपींग स्टेशन, नवनीत नगर, भुतकरवाडी, सावेडी) यांच्याकडून छगन कारभारी शेळके, कारभारी दगडू शेळके, दत्तात्रय कारभारी शेळके (रा.कासार पिंपळगाव, वृद्धेश्‍वर कारखान्याजवळ, ता.पाथर्डी) यांनी नेप्ती कांदा मार्केट मधून 23 एप्रिल 2018 ते 12 जानेवारी 2019 दरम्यान वेळोवेळी कांदा गोणी खरेदी करुन नितीन ताठे यांचा विश्‍वास संपादन करुन कांद्याच्या गोण्याची परस्पर विल्हेवाट लावली. या घटनेत ताठे यांचे कांद्याचे 28 लाख 59 हजार 242 रुपये बाबत ताठे यांनी तिघांकडे मागणी केली असता तिघांनी वेळोवेळी भूलथापा देऊन पैसे देण्यास टाळाटाळ केली आणि ताठे यांची फसवणुक केली आणि ताठे यांना पैसे मागणेसाठी आला तर जिवेच ठार मारू अशी धमकी दिली.

या प्रकरणी कोतवाली पोलिसांनी नितीन ताठे यांच्या फिर्यादीवरुन भा.दं.वि.क.420, 403, 409, 417, 418, 506, 34 प्रमाणे गुन्ह्याची नोंद केली असून अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक पालवे हे करीत आहेत.