श्रीरामपूर येथे घरफोडी करणाऱ्या दोन आरोपींना अटक

15

सामना प्रतिनिधी। नगर

श्रीरामपूर येथे घरफोडी करणार्‍या दोन आरोपींचा स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने छडा लावून 61 हजार रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने व रोख रक्कम हस्तगत केली आहे. अतिफ यासीन बागवान ( 24, वर्षे रा.काझीबाबाब रोड, वार्ड नं.2 श्रीरामपूर) साहील सालीम बागवान (वय 20, काझीबाबा रोड वॉर्ड, 2 श्रीरामपूर) अशी त्यांची नावे आहेत.

तक्रारदार नजमा कलीम बागवान या त्यांच्या मुलीच्या लग्न कार्यात व्यस्त होत्या. कार्यक्रम संपवून ते पुन्हा.23 जानेवारी रोजी रात्री घरी परतले. तेव्हा त्यांना घराचा दरवाजा सताड उघडा दिसला. त्यांनी धावत जाऊन घरात पाहता चोरट्यांनी 12000 रुपये रोख व 56000 रुपये किंमतीचे सोन्याचे सोन्याचे चैन,ख पेन्डल व मणी असे 28.24 ग्रॅम वजनाचे दागिने चोरी गेले असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यानंतर नजमा कलीम बागवान यांनी पोलिसात गुन्हा दाखल केला.

सदर गुन्याचा तपास पोलीस निरिक्षक दिलीप पवार यांच्या पथकातील कर्मचार्‍यांनी लावला. यामध्ये अतिफ बागवान याचे धागेदोरे त्यांना मिळाले त्यानी आरोपीला विश्‍वासात घेऊन विचारपूस केली असता त्याने उडवा उडवीचे उत्तरे दिले. यानंतर खाक्या दाखवताच पोलिसांनी त्यांनी योग्य माहिती दिली. व त्याच्या जवळून सोन्या चांदीचे दागीने व रोख रक्कम हस्तगत करण्यात आली.

स्थानिक गुन्हा अन्वेषन विभागाचे पोलीस निरिक्षक पवार यांच्या पथकातील पोहेकॉ दत्तात्रय गव्हाणे, मनोहर गोसावी, रविंद्र कर्डीले, संतोष लोंढे,ख सचिन अडबल, विजय ठोंबरे, भागीनाथ पंचमुखे, विजय धनेश्‍वर, बाळासाहेब भोपळे यांनी केली.

आपली प्रतिक्रिया द्या