
हिंदुस्थानला सर्वप्रथम वैयक्तिक ऑलिम्पिक पदक मिळकून देणारे मराठमोळा कुस्तीपटू म्हणजे खाशाबा दादासाहेब जाधव. त्यांच्या जीवनावर ‘खाशाबा’ हा चित्रपट येत आहे. त्याचे दिग्दर्शन नागराज मंजुळे करत आहेत. नागराज यांनी आज ‘खाशाबा’चे पोस्टर सोशल मीडियावर सादर केले. यामध्ये खाशाबा यांचा चेहरा दाखवण्यात आलेला नाही. त्यामुळी ही भूमिका कोण करणार, याबद्दल उत्सुकता लागली आहे.
नागराज यांनी पोस्टर शेअर करत़ ‘खाशाबा’ चित्रपटाची घोषणा केली. नागराज यांनी म्हटलंय,ऑलिम्पिकच्या इतिहासात हिंदुस्थानचे आणि महाराष्ट्राचे नाव गौरवाने नोंदवणाऱया अत्यंत प्रतिभावंत पैलवान खाशाबा जाधव यांच्या आयुष्यावर मला चित्रपट करायला मिळतोय, ही माझ्यासाठी अत्यंत आनंदाची बाब आहे. खऱया, अस्सल मातीतील पण जागतिक स्तरावर नाव कमवणाऱया खेळाडूची खरी ओळख लोकांपर्यंत न्यायची आहे. देशवासियांना अभिमान वाटणाऱया या व्यक्तिमत्त्वाची ओळख या चित्रपटाद्वारे जगाला व्हावी असा माझा प्रयत्न आहे.
सैराट, फँड्री या चित्रपटातून नागराज यांनी दिग्दर्शक म्हणून आपली ओळख निर्माण केली आहे. काही दिवसांपूर्वी घर बंदुक बिरयानीमध्ये ते अभिनेता म्हणूनही झळकले. जिओ स्टुडिओज् प्रस्तुत, ‘खाशाबा’ या चित्रपटाची निर्मिती ज्योती देशपांडे आणि नागराज मंजुळे यांनी केली असून लककरच चित्रीकरण सुरू होणार आहे.




























































