
दक्षिण मुंबईतील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी आणि मुंबईकरांना सुखद आणि जलद प्रवास घडविण्यासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए ) नरीमन पॉइंट ते कुलाबा असा 1.6 कि.मी. लांबीचा महत्त्वाकांक्षी उड्डाण पूल उभारण्याचा प्रकल्प हाती घेतला आहे. यासाठी एमएमआरडीएने सल्लागार कंपनीची नेमणूकही केली.
सध्या नरीमन पॉइंटहून कुलाब्याला जाण्याकरिता कॅप्टन प्रकाश पेठे हा एकमेव मार्ग असून या मार्गावरील वाहतूक कोंडीमुळे नागरिकांचा प्रचंड वेळ वाया जात आहे.
नरीमन पॉइंट ते कुलाबा नवीन पूल प्रकल्पामुळे मच्छीमार बांधवांचे कोणत्याही प्रकारचे नुकसान होणार नसून याची सर्वतोपरी काळजी घेण्यात येईल तसेच त्यांच्या बोटी ये-जा करण्यात कोणताही अडथळा निर्माण होणार नाही याची दक्षता घेऊनच सदर पुलाची रचना करण्यात येणार आहे, असे एमएमआरडीएचे महानगर आयुक्त आर. ए. राजीव यांनी सांगितले.































































