मुंबईत नाकातून बुस्टर डोस द्यायला सुरुवात

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबईत आजपासून 24 लसीकरण केंद्रांवर दोन डोस घेतलेल्या ज्येष्ठांना नाकातून देण्यात येणाऱया इन्कोव्हॅक्स लसीचा बुस्टर डोस द्यायला सुरुवात झाली. त्याचा लाभ 23 ज्येष्ठ नागरिकांनी घेतला. दरम्यान, मुंबईत आज दिवसभरात 135 जण कोरोना रुग्ण सापडले तर एकाचा मृत्यू झाला. मृत्युमुखी पडलेल्या महिला सहव्याधी असलेल्या 77 वर्षांच्या महिला होत्या. देशात कोरोनाचे 9 हजार 355 रुग्ण, 26 जणांचा मृत्यू, सक्रिय रुग्णांची संख्या आणखी घटली

देशात कोरोना रुग्णांची सरासरी संख्या 9 हजारांवर स्थिर असून आज दिवसभरात 9 हजार 355 रुग्ण सापडले तर 26 जणांचा मृत्यू झाला. केरळमध्ये सर्वाधिक 6 जणांचा मृत्यू झाला. दरम्यान, गेल्या आठवडाभरापासून सक्रिय रुग्णांची संख्या मोठय़ा प्रमाणात कमी होत असून 67 हजारांवर पोहोचललेली संख्या आज 57 हजारांवर पोहोचली आहे.

देशात मार्च महिन्याच्या मध्यापासून कोरोना रुग्णांची संख्या वाढू लागली. एप्रिल आणि मे महिन्यात ही संख्या मोठय़ा प्रमाणात वाढेल, अशी भीती तज्ञांनी व्यक्त केली होती. मात्र, एप्रिल महिन्यात वाढलेली संख्या गेल्या आठवडय़ात कमी होऊन 6 हजारांवर पोहोचली होती. मात्र, आता त्यात पुन्हा वाढ झाली असून गेल्या तीन दिवसांत ही संख्या नऊ ते साडेनऊ हजारांवर स्थिरावली आहे.

केरळमध्ये मृतांची संख्या सर्वाधिक

देशभरात कोरोना रुग्णसंख्येत मोठय़ा प्रमाणात चढउतार होत असले तरी दररोजची मृतांची संख्या ही 20 च्या पुढेच आहे. गेल्या काही दिवसांपासून मृतांची संख्या जराही कमी झालेली नाही. केरळमध्ये दररोज सापडणारे रुग्ण आणि मृत्युमुखी पडणाऱयांची संख्या देशातील मृतांपेक्षा मोठी आहे.

राज्यात 597 रुग्ण, दोघांचा मृत्यू

राज्यात गेल्या 24 तासांत 597 रुग्ण सापडले तर दोघांचा मृत्यू झाला. दिवसभरात 752 जण कोरोनामुक्त झाले तर 15 हजार 261 चाचण्या करण्यात आल्या. दरम्यान, सक्रिय रुग्णांच्या संख्येत पुन्हा वाढ झाली आहे. 2 ते 3 हजारांपर्यंत पोहोचलेली सक्रिय रुग्णांची संख्या पुन्हा वाढली असून ती 4 हजार 7 17 वर पोहोचली आहे.