सॅनिटायझर प्यायल्याने एकाचा मृत्यू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

इंदिरानगर येथील अविनाश गणपत मोरे (39) यांनी शनिवारी रात्री सॅनिटायझर प्यायल्याने उलटय़ा होऊन छातीत दुखू लागले. त्यांना खासगी रुग्णालयात आणले असता कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला. पुढील उपचारासाठी दुसऱ्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे मेंदूत रक्तस्त्रावाने मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले, अशी माहिती इंदिरानगर पोलिसांनी दिली.