महापालिका विषय समित्यांवर शिवसेना-भाजप युतीचे वर्चस्व

62

सामना प्रतिनिधी। नाशिक

नाशिक महापालिकेच्या आरोग्य, महिला बालकल्याण, शहर सुधार आणि विधी या विषय समित्यांवर मंगळवारी महापौर रंजना भानसी यांनी सदस्यांची निवड केली. या सर्व समित्यांवर शिवसेना-भाजपा युतीचे वर्चस्व आहे.

आरोग्य समिती सदस्यपदी शिवसेनेचे नगरसेवक रमेश धोंगडे, चंद्रकांत खाडे, सुवर्णा मटाले, आशा तडवी, भाजपाच्या पूनम धनगर, दीपाली कुलकर्णी, शाम बडोदे, अर्चना थोरात, अंबादास पगारे व काँग्रेसच्या आशा तडवी या नऊ सदस्यांची निवड झाली.

विधी समिती सदस्यपदी शिवसेनेचे नगरसेवक सूर्यकांत लवटे, चंद्रकांत खाडे, डी. जी. सूर्यवंशी, भाजपाच्या अनिता सातभाई, रुची कुंभारकर, नीलेश ठाकरे, रवींद्र धिवरे, राकेश दोंदे व राष्ट्रवादी काँग्रेसच्या शोभा साबळे यांची निवड करण्यात आली.

महिला बालकल्याण समितीवर शिवसेनेच्या नगरसेविका सिमा निगळ, रंजना बोराडे, हर्षा बडगुजर, भाजपाच्या पूनम सोनवणे, मीरा हांडगे, प्रियंका घाटे, हेमलता कांडेकर, इंदुबाई नागरे व राष्ट्रवादी काँग्रेसच्या समिना मेमन यांची सदस्य म्हणून निवड झाली.

शहर सुधार समितीच्या सदस्यपदी शिवसेनेचे नगरसेवक भागवत आरोटे, सुदाम डेमसे, डी. जी. सूर्यवंशी, भाजपाचे सुरेश खेताडे, अनिल ताजनपुरे, शांता हिरे, सिमा ताजणे, छाया देवांग व काँग्रेसचे राहुल दिवे यांची निवड झाली आहे.

या सर्व सदस्यांचे महापौर रंजना भानसी, उपमहापौर प्रथमेश गीते, विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते, सभागृह नेते सतिश सोनवणे, भाजपा गटनेते जगदीश पाटील, सुधाकर बडगुजर आदी पदाधिकाऱयांनी अभिनंदन केले.

आपली प्रतिक्रिया द्या