नाशिकमध्ये कर्जाला कंटाळून वडिलांसह दोन मुलांची आत्महत्या

सातपूरच्या श्रमिकनगर भागात कर्जाला पंटाळून वडिल व दोन तरुण मुलांनी रविवारी राहत्या घरात गळफास घेवून आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे. सातपूरच्या श्रमिकनगर येथील धनाई-पुनाई रो-हाऊसमध्ये राहणारे शिरोडे कुटुंब सातपूरमध्ये फळे व भाजीपाला विक्रीचा व्यवसाय करते. दीपक शिरोडे यांच्या पत्नी एका मुलासह दुपारी एकच्या सुमारास देवदर्शनासाठी मंदिरात गेल्या होत्या. दुपारी चारच्या सुमारास ते घरी परतले. दरवाजा उघडताच हॉलमध्ये दीपक सुपडू शिरोडे (52) हे गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळले आणि या दोघांनी एकच हंबरडा पह्डला. पिंचाळ्यांमुळे शेजाऱयांनीही तेथे धाव घेतली. दीपक शिरोडे यांचा मुलगा प्रसाद (26) हा किचनमध्ये, तर राकेश (25) बेडरूममध्ये गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळले.