
पैठण- जायकवाडी धरणात सध्या प्रतिसेकंद 5 जार क्युसेकप्रमाणे नवीन जलौघ दाखल होत आहे. सर्वदूर पावसामुळे पाणीसाठ्यात सातत्याने वाढ होत आहे. नाथसागर तुडुंब भरण्यासाठी 9 फूट पाणीपातळीची गरज असली तरी संभाव्य पूरस्थितीबाबत प्रशासन मात्र गाफील असल्याचे समोर आले आहे. धरणातील पाण्याची आवक व गोदाकाठावरील पूरप्रवण क्षेत्रातील 18 च्या सुरक्षिततेच्या पार्श्वभूमीवर अद्यापही ‘पूरनियंत्रण आणि उपाययोजना’ बैठक घेण्यात आलेली नाही. हे विशेष !
गतवर्षी होता 98टक्के साठा
प्रकल्पात सध्या 46.10 साठा आहे. गेल्यावर्षी आजच्या तारखेला धरणात तब्बल 98.62 साठा होता. 1522 फूट जलसाठवण क्षमता असलेल्या या प्रकल्पाच्या पाणीमापक यंत्रावर आज ७ सप्टेंबर रोजी 1510.50 ट एवढ्या पाणीपातळीची नोंद झाली आहे. एकूण 1738.935 शलक्ष घनमीटर असलेल्या या पाणपसाऱ्यापैकी 1000.829 शलक्ष घनमीटर एवढा पाणीसाठा वापरायोग्य (जिवंत) आहे. मागील वर्षी जिवंत पाणीसाठा 2421.083 शलक्ष घनमीटर एवढा होता.
बॅकवॉटर परिसरात तुफान पाऊस…
दरम्यान, जायकवाडी धरणाच्या मागील बाजूस शेवगाव, पाथर्डी, नेवासा, तिसगाव व बॅकवॉटर भागात पावसाने सरासरी ओलांडली आहे. थेट जलाशयावर पडणाऱ्या पर्जन्यमानाची तर नोंदही होत नाही. त्यामुळे नाथसागरात पाण्याची आवक वाढतच चालली आहे. पाणलोटक्षेत्रातील सरासरी पर्जन्यमान 553लीमीटर एवढे नोंदवले गेले आहे. ‘वर’च्या भागांत असलेले 9 टे मोठे प्रकल्प जवळपास पूर्णपणे भरले आहेत. सध्या प्रतिसेकंद 5 हजार 60 सेक्स याप्रमाणे पाण्याची आवक चालू आहे. बॅकवॉटर परिसरातील धरणांमधून अचानक पाणी सोडल्यास जायकवाडीत मोठ्या प्रमाणात पाणी दाखल होण्याची भीती आहे.
धरणाच्या पाणीस्थितीबाबत तहसीलदार अनभिज्ञ
गोदावरी नदी सध्या तुडुंब भरलेली आहे. नदीवरील आपेगाव आणि हिरडपुरी हे दोन्ही बंधारे पूर्णक्षमतेने भरल्यामुळे नदीपात्रात पाणी सोडण्यात येत आहे. गोदाकाठी असलेल्या तालुक्यातील 18 वांमध्ये मुसळधार पाऊस चालू आहे. जायकवाडी धरणात पाण्याची आवक वाढली आहे. अशा स्थितीत धरणातून गोदापात्रात पाणी सोडण्याची वेळ आल्यास गोदाकाठावरील गावांमध्ये महापुराची स्थिती उद्भवणार आहे. या पार्श्वभूमीवर जलसंपदा व महसूल विभागात समन्वयाचा अभाव असल्याचे स्पष्ट झाले आहे.
तहसीलदार चंद्रकांत शेळके यांना विचारणा केली असता त्यांनी सांगितले की, महसूल विभागाकडे धरणाच्या पाणीस्थितीची माहिती आलेली नाही. त्यामुळे किती पाण्याची आवक होत आहे याची माहिती नाही.’ अशी अनभिज्ञता व्यक्त केली. ‘तथापि सध्या तरी महापुराचा धोका नाही. पाण्याची आवक 10 जार क्युसेकच्या पुढे गेल्यावर नैसर्गिक आपत्ती निवारण व उपाय याबाबतची बैठक घेऊ.’ असे अजब स्पष्टीकरणही त्यांनी दिले. जलसंपदा विभागाचे जायकवाडी (उत्तर) येथील प्रभारी कार्यकारी अभियंता यांना विचारणा केली असता ‘मी बैठकीत आहे.’ एवढेच त्यांनी सांगितले.


























































