बॉम्बच्या धमकीमुळे दिल्लीतील 8 शाळा रिकाम्या केल्या; पोलिसांचा तपास सुरू

नवी दिल्लीतील संस्कृती शाळेत बॉम्ब असल्याची धमकी ईमेलद्वारे देण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली असून तपासाला सुरुवात केली आहे. संस्कृती ही दिल्लीतील महत्त्वाच्या शाळांपैकी एक आहे. ही माहिती मिळाल्यानंतर शाळा रिकामी करण्यात आली असून पोलिसांचे पथक शाळेत शोधकार्य करत आहेत. हा धमकीचा मेल काल रात्री शाळेला आला होता.

ही धमकी मिळाल्यानंतर पोलिसांनी विद्यार्थ्यांना घरी पाठवले असून याबाबतची माहिती पालकांना देण्यात आली आहे. शाळेला आलेल्या एका ईमेलमुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी त्यांना घरी पाठवण्यात येत आहे, असे पोलिसांकडून सांगण्यात आले. नोयडा येथील एका शाळेलाही बॉम्ब असल्याचा ईमेल आला आहे. त्यानंतर ही शाळाही रिकामी करण्यात आली.

दिल्लीतील एकूण 8 शाळांना अशाप्रकारचे ईमेल आले असून सुरक्षेसाठी शाळा रिकाम्या करण्यात आल्या असून विद्यार्थ्यांना घरी पाठवण्यात आले आहे. एका शाळेत परीक्षा सुरू होत्या. मात्र, परीक्षा थांबवून विद्यार्थ्यांना घरी पाठवण्यात आले आहे. दिल्लीतील काही शाळांना अशाप्रकारचे ईमेल आले असून सुरक्षेसाठी विद्यार्थ्यांना घरी पाठवण्यात आले आहे. कोणताही दहशत पसरवण्यासाठी असे प्रकार करत असल्याचे पोलिसांनी सांगितले. ईमेल आलेल्या शाळांमध्ये शोधकार्य सुरू असून काहीही संशयास्पद सापडले नसल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.