
सामना ऑनलाईन । औरंगाबाद
बिहारमधील औरंगाबाद या नक्षलग्रस्त जिल्ह्यातील देव गावात शुक्रवारी रात्री नक्षलवाद्यांनी प्रचंड हिंसाचार केला. नक्षलवाद्यांनी चार बससहित दहा गाड्या जाळल्या तसेच एका व्यक्तिची हत्या केली. हत्या करण्यात आलेली व्यक्ती ही बिहार विधान परिषदेचे आमदार राजन सिंह यांचे काका आहेत. केंद्रीय राखील पोलीस दलाचे जवान व जिल्हा पोलीस घटनास्थळी पोहोचले असून या भागात शोधमोहीम सुरू करण्यात आली आहे.
Bihar: Naxals torched four buses and shot dead one person in Dev, in Aurangabad, last night; CRPF and district police present at the spot pic.twitter.com/qg8g4n24yT
— ANI (@ANI) December 30, 2018
औरंगाबादमध्ये ट्रान्स्पोर्टचा व्यवसाय करणाऱ्या दोन व्यावसायिकांच्या घरांजवळ हा हिंसाचार घडवून आणला होता. त्यांनी त्या व्यावसायिकांच्या खासगी गाड्यांसहित एकूण सहा गाड्या व चार बस जाळल्या. या हिंसाचारात आमदार राजन सिंह यांचे काका नरेंद्र सिंह यांचा मृत्यू झाला, तर 12 हून अधिकजण जखमी झाले.
























































