मला राजकारणातून बरबाद करण्यासाठी रचलेला ‘तो’ डाव, जितेंद्र आव्हाडांचा सरकारवर हल्लाबोल

‘ठाण्यात माझ्यावर जी पोलीस कारवाई झाली तो मला मुंब्य्रातून किंबहुना राजकारणातूनच बरबाद करण्याचा डाव होता,’ असा हल्लाबोल माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारवर आज केला. बाकी इतर काय गुन्हे दाखल करायचे आणि तुरुंगात टाकायचे ते टाका, मात्र मुंब्य्रात एका मुस्लिम महिलेला पुढे करून मला बरबाद करण्यासाठी रचलेला तो डाव मी आयुष्यात कधीच विसरणार नाही, असेही ते म्हणाले.

ठाण्यात आयोजित पत्रकार परिषदेत आव्हाड बोलत होते. ‘ठाण्यात सरकार एकाच घरातील तीन तीन लोकांवर मोक्का लावत आहे’, असा आरोपही त्यांनी केला. माझ्यावर दोन्ही गुन्हे दाखल करताना मला पोलीस अधिकाऱ्यांची अस्वस्थता दिसत होती. मुंब्रा येथील 354 चा गुन्हा तो मी माझ्या आयुष्यात कधीच विसरणार नाही, असेही ते म्हणाले.