साताऱ्यात दोन पराभूत उमेदवारांना सारखीच मतं, निवडणूक आयोगाने घोटाळा केल्याचा जितेंद्र आव्हाड यांचा आरोप

सातारा जिल्ह्यात दोन विधानसभा मतदारसंघात दोन पराभूत उमेतदवारांना सारखी मतं मिळाली आहेत. त्यामुळे निवडणूक आयोगाने घोटाळा केला आहे, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने केला आहे. तसेच लक्षात येईल असे घोटाळे करू नये असा टोलाही आव्हाड यांनी लगावला आहे.

एक्सवर व्हिडीओ पोस्ट करून आव्हाड म्हणाले की, महाराष्ट्रात घोटाळे करताना इलेक्शन कमिशनने तारतम्यही बाळगले नाही. साताऱ्यात त्यांनी काय केले बघा, कराड उत्तर मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस- शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार बाळासाहेब पाटील यांना 90, 935 मते मिळाली. तसेच, पाटण मतदारसंघात सत्यजित पाटणकर यांनाही 90, 935 एवढीच मते मिळाली. तिथे गेलेली ईव्हीएम ही सख्खी भावंडे होती की काय? हास्यास्पद आहे; पण, हीच महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीची सत्यता आहे असेही आव्हाड म्हणाले.