
नेस्को केंद्रात झालेल्या पार्टीत दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला होता. याची गंभीर दखल वनराई पोलिसांनी घेतली आहे. पोलिसांनी जबाब नोंदवण्यावर भर दिला आहे. पोलिसांनी आतापर्यंत 12 जणांचे जबाब नोंदवले आहेत.
गेल्या आठवड्यात नेस्को प्रदर्शन केंद्रात पार्टीचे आयोजन केले होते. त्या पार्टीत ड्रगच्या अतिसेवनाने दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला होता. पार्टी प्रकरणात पोलिसांनी सखोल तपास सुरू केला आहे. पोलिसांनी काही विद्यार्थ्यांचे जबाब नोंदवले आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पार्टी सुरू होण्यापूर्वी एका अॅप्सच्या माध्यमातून डिलिव्हरी बॉयकडून त्या पिवळ्या गोळ्या आणल्या गेल्या होत्या. त्या गोळ्यांचे नंतर वितरण झाल्याचे समजते. पोलिसांनी आतापर्यंत 12 जणांचे जबाब नोंदवले आहेत. पार्टीला हजर असणाऱया विद्यार्थ्यांचा पोलीस जबाब नोंदवत आहेत. मृत विद्यार्थ्यांचे सिद्धार्थ शव विच्छेदन पेंद्रात ऑन पॅमेरा शवविच्छेदन करण्यात आले. शवविच्छेदन केल्यानंतर दोघांचे मृतदेह त्यांच्या पालकांच्या स्वाधीन करण्यात आले. मृत्यूचे नेमके कारण शोधण्यासाठी व्हिसेरा फॉरेन्सिक लॅब कलिना येथे पाठवण्यात आले आहे.
ड्रगची टीप दिल्याच्या संशयावरून हल्ला
एमडी ड्रगची टीप तपास यंत्रणांना दिल्याच्या संशयावरून दोघांनी एका तरुणाला मारहाण करून ब्लेडने हल्ला केल्याची घटना जोगेश्वरी येथे घडली. या प्रकरणी मेघवाडी पोलिसांनी दोघा भावांविरोधात गुन्हा नोंद केला. तक्रारदार हा जोगेश्वरी येथे राहत असून तो खासगी पंपनीची (अॅप्स बेस वाहतूक सेवा)चे काम करतो. त्याच परिसरात एकजण राहतो. त्याच्या विरोधात काही गुन्हे दाखल आहेत. गेल्या काही वर्षांपासून तो एमडी ड्रगच्या तस्करीत होता. 2021 मध्ये त्याच्या घरी एनसीबीने छापा टाकला. छापा टाकून त्याला अटक केली होती. नुकतीच त्याची जामिनावर सुटका झाली होती.



























































