
सामना ऑनलाईन । मुंबई
16 डिसेंबर 2012 रोजी दिल्लीत झालेल्या एका घटनेमुळे सारा देश बिथरला होता. चालत्या बसमध्ये एका तरुणीवर बलात्कार करून अमानुषपणे तिच्यावर अत्याचार करण्यात आले होते. नंतर उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला होता. त्यानंतर देशात एकच असंतोषाची लाट पसरली होती. त्यावरच आधारित नेटफ्लिक्सची दिल्ली क्राईम या वेबसीरीजचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे.
गेल्या काही वर्षात नेटफ्लिक्सने हिंदुस्थानी कथानक व सहिंतांवर आधारित आशय निर्मिती केली आहे. त्यात सेक्रेडे गेम्स, सोनी, ऑस्कर विजेती लघुपट पीरियड, लव्ह पर स्केअर फूट, ब्राह्म्हण नमन हे चित्रपट आणि वेबसीरीजचा समावेश आहे. त्यात आता दिल्ली क्राईम या वेबसीरीजचीही भर पडली आहे. या वेबसीरीजमध्ये शेफाली शहा या पोलिसाच्या भुमिकेत असून निर्भया प्रकरण त्यांनी कसे हाताळले त्याचे चित्रण या वेबसीरीजमध्ये पहायला मिळणार आहे. 22 मार्च रोजी ही वेबसीरीज प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.





























































