स्‍मार्ट वैशिष्‍ट्यांसह टाटाची नवीन NEXON EV PRIME लाँच

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आपली न्‍यू फॉरेव्‍हर अशी ओळख कायम ठेवत टाटा मोटर्सने आज नेक्‍सॉन ईव्‍ही प्राइम लाँच केली. या नव्या नेक्‍सॉन मध्ये मल्‍टी-मोड रिजेन, रिजेनवर ऑटोमॅटिक ब्रेक लॅम्‍प अॅक्टिव्‍हेशन, क्रूझ कंट्रोल, इनडायरेक्‍ट टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टिम (आयटीपीएमएस), स्‍मार्टस्विच इंटीग्रेटेड कनेक्‍टीव्‍हीटी वैशिष्‍ट्य आणि 110 सेकंदांचा चार्जिंग टाइमआऊट अशी उच्‍चस्‍तरीय स्‍मार्ट वैशिष्‍ट्ये आहेत.

या अपडेटचा विद्यमान मालकांना त्‍यांचा ड्राइव्‍ह अनुभव, कनेक्‍टीव्‍हीटी आणि कार्यक्षमता वाढवत ‘इव्‍हॉल्व्हिंग टू इलेक्ट्रिक’च्‍या दिशेने प्रवासामध्‍ये लाभ होणार आहे. टाटा मोटर्स त्‍यांच्‍या विद्यमान ग्राहकांना 25 जुलै 2022 पासून कंपनीच्‍या ऑथोराइज्‍ड सर्विस सेंटर्समध्‍ये पहिले मोफत सॉफ्टवेअर अपडेट देणार आहे. यासाठी टाटा मोटर्स लवकरच ग्राहकांकरिता माहितीपूर्ण उपक्रम राबवणार आहे. त्‍यानंतर सर्व विद्यमान मालकांसाठी सॉफ्टवेअर अपडेट्स सशुल्‍क आधारावर असतील.

याबद्दल टाटा पॅसेंजर इलेक्ट्रिक मोबिलिटीचे मार्केटिंग, सेल्‍स व सर्विस स्‍ट्रॅटेजीचे प्रमुख विवेक श्रीवत्‍स म्‍हणाले, की नेक्‍सॉन ईव्‍हीने संपूर्ण देशाचे लक्ष वेधून घेतले आहे आणि लाँचपासून इलेक्ट्रिक विभागामध्‍ये सातत्‍याने अग्रस्‍थानी राहिली आहे. 65 टक्‍क्‍यांहून अधिक मार्केट शेअरसह ही ईव्‍ही इच्‍छुकांसाठी पहिली निवड आहे. नेक्‍सॉन ईव्‍ही प्राइमसह आम्‍हाला आमचे उत्‍पादन ऑफरिंगचे धोरण अधिक प्रबळ होण्‍याची अपेक्षा आहे. विद्यमान ग्राहकांसाठी या सॉफ्टवेअर अपडेटसह आम्‍ही ग्राहक टाटा ईव्‍ही मालकीहक्‍क अनुभवाचा भाग म्‍हणून करू शकणा-या अपेक्षांचा नवीन बेंचमार्क स्‍थापित करत आहोत.

नेक्‍सॉन ईव्‍ही प्राइम अस्‍पायरेशल इलेक्ट्रिक एसयूव्‍ही आहे, जी शून्‍य उत्‍सर्जनांसह एकाच चार्जमध्‍ये 312 किमीची एआरएआय रेंज देते. या इलेक्ट्रिक गाडीमध्ये उच्‍च क्षमतेची 30.2 केडब्‍ल्‍यूएच लिथियम-आयन बॅटरीची शक्‍ती असलेली शक्तिशाली व उच्‍च-कार्यक्षम 129 पीएस परमनण्‍ट-मॅग्‍नेट एसी मोटर आहे. कारलाइनसोबत उद्योगातील सर्वोत्तम धूळरोधक व जलरोधक बॅटरी पॅक येते, जे आयपी 67 मानकांची पूर्तता करते. तसेच बॅटरी व मोटरवर 8 वर्षे किंवा 1,60,000 किमी वॉरंटी देखील येते. याव्‍यतिरिक्‍त कारमध्‍ये रिमोट कमांड्स, वेईकल ट्रॅकिंग ते ड्रायव्हिंग बीहेवियर अॅनालिटिक्‍स, नेव्हिगेशन व रिमोट डायग्‍नोस्टिक्‍स अशी 35 मोबाइल अॅप-आधारित कनेक्‍टेड वैशिष्‍ट्ये आहेत. नेक्‍सॉन ईव्‍ही तीन रंगांमध्‍ये उपलब्‍ध आहे: सिग्‍नेचर टील ब्‍ल्‍यू, ग्‍लेशियर व्‍हाइट आणि नुकतेच सादर केलेला डेटोना ग्रे अपडेट. नेक्‍सॉन ईव्‍हीमध्‍ये उपलब्‍ध आहे.