आता व्हॉट्सअॅप मेसेजचा स्पीड बदलता येणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

व्हॉट्सअॅप हे मेसेंजिंग अॅप अधिकाधिक युजर्सच्या पसंतीला पडावे, यासाठी कंपनीतर्फे नवनवीन फीचर आणले जातात. सध्या असेच एक नवे फीचर अँड्रॉइड मोबाईलसाठी कंपनीने आणले आहे. या फीचरमुळे आपल्याला व्हॉईस मेसेज वेगवेगळ्या प्लेबॅक स्पीडवर चालवता येईल. सध्या स्पीड कंट्रोल फीचर केवळ अँड्रॉईड बीटा युजर्ससाठी सुरू झाले आहे. व्हॉट्सअॅप युजर बीटा व्हर्जनसाठी ते रजिस्टर करू शकतात. त्यानंतर त्यांना नवे फीचर वापरता येईल. आयओएस मोबाईलवर सध्या हे फीचर वापरता येणार नाही. हे फिचर सध्या तीन वेगवेगळ्या प्लेबॅक स्पीड व्हॉईस मेसेजमध्ये आहे. त्यासाठी व्हॉईस मेसेजच्याजवळ प्लेबॅक स्पीडचा सिम्बॉल देण्यात आलाय. त्यामध्ये तीन वेगवेगळे प्लेबॅक स्पीड कंट्रोल देण्यात आले आहेत. त्यापैकी एक स्पीड निवडता येईल.