सोशल मीडियावर माजी आमदाराची बदनामी केली, गुन्हा दाखल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी। नेवासा

सोशल मीडियावर नेवासा तालुक्याचे माजी आमदार शंकरराव गडाख यांच्या बद्दल आक्षेपार्ह व बदनामीकारक पोस्ट टाकल्याने ऋषिकेश शेटे व माऊली ढोकणे या दोन जणांवर अदखल पात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गेल्या दोन दिवसांपासून फेसबुक व व्हॉट्सअपवर गडाख यांच्याबद्दल आक्षेपार्ह भाषेतील मजकुर पोस्ट करण्यात येत होता. यामुळे गडाख समर्थकांनी संताप व्यक्त करत यास जबाबदार व्यक्तींवर कठोर कारवाई करण्याची विनंती केली होती. या पोस्टवरुन गावातील वातारण तापले होते. युवा कार्यकर्ते गणेश कोरेकर यांनी याबदद्ल पोलिसांत तक्रार दाखल केली होती. त्यानंतर या घटनेची अदखल पात्र गुन्हा म्हणून नोंद करण्यात आली. गडाख यांच्याबद्दल ऋषिकेश आणि माऊली सोशल साईटवर आक्षेपार्ह मजकूर टाकत असल्याचे स्पष्ट झाल्याने त्यांच्यावर सायबर क्राईम अंतर्गत कारवाई करण्यात येईल असे आश्वासन पोलीस निरीक्षक डॉ शरद गोर्डे यांनी कार्यकर्त्यांना दिले आहे.