
महिनाभरापूर्वी ओलाने केलेल्या प्रवासाची शिल्लक रक्कम परत करणे एका प्रवाशाला चांगलेच महागात पडले. पैसे परत करण्याच्या प्रयत्नात असलेल्या नरेंद्र आवटी यांना सायबर भामट्यांनी एनी डेक्स हे अॅप डाऊनलोड करण्यास सांगून त्यांच्या बँक खात्यातील एक लाखाची रक्कम वळती करून घेतली.
तळोजा येथील एका खासगी पंपनीत काम करणाऱया नरेंद्र आवटी यांनी ऑक्टोबर महिन्यात ओलाने प्रवास केला होता. त्या प्रवासाचे 450 रुपये आवटी यांना ओलाला देणे बाकी होते. ते पैसे लवकरात लवकर परत करावे याकरिता पंपनीकडून वारंवार कॉल येत होते. त्यामुळे पैसे परत करण्यासाठी आवटी यांनी गुगलवर पंपनीच्या संकेतस्थळावरील ग्राहक संपर्क क्रमांकावर संपर्क साधला. त्यानंतर थोडय़ाच वेळात आवटी यांना दुसऱया क्रमांकावरून पह्न आला व पैसे देण्यासाठी एनी डेक्स हे अॅप डाऊनलोड करण्यास सांगितले. त्यानुसार आवटी यांनी तो अॅप डाऊनलोड केल्यावर आरोपीने त्यांना बोलण्यात गुंतवून ठेवत शिताफीने आवटी यांच्या बँक खात्यातील एक लाखाची रोकड वळती करून घेतली. याप्रकरणी आवटी यांच्या तक्रारीवरून विक्रोळी पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दखल करण्यात आला आहे.






























































