मुंबई गोवा महामार्गावर उधळे नजीक अपघात; महेंद्रा पिकअप व्हॅनच्या धडकेत पादचारी ठार

4

सामना प्रतिनिधी । खेड

मुंबई गोवा महामार्गावरील उधळे गावानजीक भरधाव वेगातील महेंद्रा महेंद्रा पिकअप व्हॅनने दिलेल्या धडकेत पादचारी जागीच ठार झाला. हरिश्चंद्र मोरे असे या दुर्दैवी पादचाऱ्यांचा नाव असून ते उधळे गावचे रहिवाशी होते.

घटना स्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार हरिश्चंद्र मोरे (५५) हे महामार्गावरून पायी जात असताना मुंबई दिशेकडून चिपळूणकडे भरधाव वेगाने जाणाऱ्या व्हॅनने त्यांना जोरदार धडक दिली. या अपघातात गंभीर जखमी झालेल्या मोरे यांचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर महामार्गावर जमलेल्या जमावाने रास्ता रोको केल्याने महामार्गावर वाहतुकीची कोंडी झाली होती. पोलिसांनी युटिलिटी चालकाला ताब्यात घेतल्यानंतर जमाव थोडासा शांत झाला.