
परळी गंगाखेड रस्त्यावरील दगडवाडी जवळ आज सकाळी नऊच्या सुमारास एका रुग्णवाहिकेचा अपघात झाला असून यात रुग्णवाहिकेचा चालक जागेवरच ठार झाल्याची घटना घडली आहे.
गंगाखेड येथील रुग्णवाहिका एका रुग्णाला अंबाजोगाई येथे सोडून परत गंगाखेडकडे जात असताना दगडवाडी जवळील चढावर चालकाचा वाहनावरील ताबा सुटला आणि ही रुग्णवाहिका रस्ता सोडून पलटी झाली. यात रुग्णवाहिकेचा चालक जागीच ठार झाला आहे. गजानन चिलगर असे मयताचे नाव असल्याचे प्राथमिक माहिती समोर आली आहे. मयताचा मृतदेह परळी उपजिल्हा रुग्णालयात उत्तरीय तपासणीसाठी पाठविण्यात आला आहे. परळी ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली आहे.






























































