पठाणकोट येथे लष्कराच्या गणवेशातील 4 संशयितांना अटक

39

सामना ऑनलाईन। पठाणकोट

पंजाबमधील पठाणकोट- जालंधर राष्ट्रीय मार्गावर चार संशयितांना अटक करण्यात आली आहे. या चारही जणांनी लष्कराचा गणवेश परिधान केला होता. येथील नंगलपूर गावातून त्यांना अटक करण्यात आली. हिमाचल प्रदेशची नंबर प्लेट असलेल्या स्कॉर्पियो गाडीतून हे सर्वजण जात होते. पण सगळीकडे नाकाबंदी असल्याने त्यांना गाडी थांबवावी लागली. त्यावेळी त्यांच्या हालचाली संशयास्पद वाटल्याने पोलिसांनी त्यांना गाडीतून खाली उतरवले. चौकशीत ते जवान नसल्याचे स्पष्ट झाले.

काही दिवसांपूर्वी अमृतसर येथे ग्रेनेड हल्ला झाला होता. तेव्हापासून पोलिसांनी शोधमोहीम हाती घेतली असून नाकाबंदी सुरू केली आहे. याआधीही कश्मीर व इतर राज्यातील गाड्या घेऊन संशयित पंजाबमध्ये घुसल्याच्या घटना घडल्या आहेत. 14 नोव्हेंबर रोजीही जम्मू-पंजाब सीमेवर इनोवातून जाणाऱ्या 4 संशयितांना अटक करण्यात आली होती. या टोळके जम्मूमधील इनोवा घेऊन पळत होते. पण पोलिसांनी त्यांना वेळीच अटक केली.

आपली प्रतिक्रिया द्या