अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीचे नेते नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्या प्रकरणातील आरोपी विक्रम भावे याला मुंबई हायकोर्टाने दिलेल्या जामीनाला हरकत घेणारी मुक्ता दाभोलकर यांची याचिका आज सुप्रीम कोर्टाने फेटाळली. हायकोर्टाने जामीनाचे उचित कारणांसह आदेश दिले आहेत. सबब या याचिकेची दखल घ्यायचे कोणतेही कारण दिसत नाही, असे सांगत न्या. सुंद्रेश आणि न्या. भट्टी यांनी दाभोलकर यांच्या कन्या मुक्ता यांची याचिका निकालात काढली.