Photo – परी म्हणू की सुंदरा… पाहा मृणाल ठाकूरच्या मोहक अदा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सीतारामम या चित्रपटातून प्रसिद्धीच्या झोतात आलेली अभिनेत्री म्हणजे मृणाल ठाकूर. मराठी असलेली ही अभिनेत्री सीतारामम या दाक्षिणात्य चित्रपटासह सुपर 30, लव्ह सोनिया, जर्सी अशा चित्रपटांमधूनही झळकली आहे. तिने तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर एका फोटोशूटचे फोटो अपलोड केले आहेत. पेस्टल पिंक रंगाच्या पोशाखात ती खूपच सुंदर दिसत आहे. तिच्या या फोटोवर चाहत्यांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे.