
वडील आणि मुलगा यांच्यातील संघर्ष, प्रेमकथा आणि त्याला असलेल्या विनोदाच्या पह्डणीतून ‘पिल्लू बॅचलर’ हा चित्रपट प्रेक्षकांची पुरेपूर हसवणूक करणार आहे. चित्रपटाचा ट्रेलर नुकताच लाँच करण्यात आला असून हा चित्रपट 15 डिसेंबरला प्रदर्शित होणार आहे.
‘पिल्लू बॅचलर’ने नावापासूनच उत्सुकता निर्माण केली आहे. अरविंद जगताप यांनी लिहिलेल्या या चित्रपटाचे दिग्दर्शन तानाजी घाटगे यांनी केले आहे. ‘बस्ता’, ‘बरड’ असे चांगले चित्रपट तानाजी घाडगे यांनी यापूर्वी दिग्दर्शित केले आहेत. मंगेश कागणे यांनी गीतलेखन, तर चिनार महेश यांचे संगीत दिग्दर्शन आहे. चित्रपटात पार्थ भालेराव, सायली संजीव, अक्षया देवधर, शिवाली परब, शशांक शेंडे, डॉ. मोहन आगाशे, भारत गणेशपुरे, सविता मालपेकर, अक्षय टांकसाळे, किशोर चौघुले यांनी काम केले आहे.





























































