मुंबईवरील 26/11 हल्ल्याचा उल्लेख करत मोदींचा काँग्रेसवर निशाणा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । सूरत

सूरतमध्ये बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी युपीए सरकारच्या काळात झालेल्या मुंबई हल्ल्याचा उल्लेख करत काँग्रेसवर जोरदार हल्ला चढवला. युपीए सरकारच्या काळात 26/11 झाला आणि आमच्या काळात उरी हल्ला, परंतु मुंबई हल्ल्यानंतर ते फक्त हातावर हात ठेऊन शांत बसले तर आम्ही पाकिस्तानात घुसून कारावाई केल्याचे मोदी म्हणाले.

पंतप्रधान मोदी म्हणाले की, ‘युपीए सरकारच्या काळात वर्तमानपत्रे घोटाळ्यांच्या बातम्यांना भरून जायचे, परंतु आता हेडलाईन्स बदलल्या आहेत. तसेच 26/11 हल्ल्यानंतर कय झाले? त्यानंतर फक्त मेनबत्त्या पेटवून निषेध करण्यात आला. परंतु आमच्या सरकारच्या काळात उरी हल्ला झाला. उरी हल्ल्याने आम्हाला झोपू दिले नाही. सीमेवर देशाचे रक्षण करणाऱ्या जवानांच्या रक्ताचा प्रत्येक थेंब आमच्यासाठी पवित्र आहे. उरी हल्ल्यानंतर आमच्यात आग भडकत होती आणि त्याचा परिणाम सर्जिकल स्टाईकमध्ये झाला.’

दरम्यान, मोदींच्या भाषणावेळी त्यांना काहींना प्रश्नही विचारले. एका तरुणाने 2019 मध्ये होणाऱ्या महाआघाडीबाबत मोदींना प्रश्न विचारला. याला उत्तर देताना मोदी म्हणाले की, मला कोणाची भिती वाटत नाही. माझे जीवन हे एक खुली किताब असून हिच ताकद असल्याचे मोदी म्हणाले.