
राज्यातील 511 ग्रामपंचायतींमध्ये सुरू झालेल्या कौशल्य विकास केंद्रांच्या माध्यमातून कौशल्य मिळवून महाराष्ट्रातील तरुण जगभरात चांगल्या पगाराची नोकरी मिळवू शकणार असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आज म्हणाले.
महाराष्ट्रातील 511 ग्रामपंचायतींमध्ये ‘प्रमोद महाजन कौशल्य केंद्रां’चे लोकार्पण आज पंतप्रधान मोदींच्या हस्ते झाले. ते या कार्यक्रमाला ऑनलाइन हजर होते. संपूर्ण जगात सध्या कौशल्यवान तरुणांची मागणी वाढत असताना अनेक देशांमध्ये वृद्धांची संख्या वाढत आहे. असे असताना जगातील 16 देश तब्बल 40 लाख नोकऱया कौशल्यवान उमेदवारांना देण्यासाठी तयार असल्याचे सर्वेक्षणातून समोर आले आहे. यामध्ये बांधकाम, आरोग्य, पर्यटन, शिक्षण आणि वाहतूक अशा क्षेत्रांचा समावेश आहे. त्यामुळे आपल्याकडे निर्माण होणाऱया कौशल्यप्रधान मनुष्यबळासाठी परदेशात चांगली संधी असल्याचे पंतप्रधान म्हणाले.
– ग्रामपंचायत स्तरावरील कौशल्य जागतिक स्पर्धेत टिकणार का, असा सवाल तरुणांमधून उपस्थित केला जात असल्यामुळे मोदींची घोषणा म्हणजे ‘गाजर’ ठरणार असल्याचे बोलले जात आहे.
























































