
संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान राज्यसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणाला उत्तर देताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा एकदा देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचा उल्लेख केला. सोमवारी लोकसभेतील भाषणात पीएम मोदींनी पंडित नेहरूंशी संबंधित काही गोष्टींचा उल्लेख केला होता. आज वरिष्ठ सभागृहात आपल्या भाषणादरम्यान पंतप्रधान म्हणाले, ‘हे वर्ष गोवा मुक्तीला 60 वर्षे पूर्ण होत आहे. सरदार पटेलांनी ज्या प्रकारे हैदराबाद आणि जुनागडसाठी रणनीती बनवली होती, तशीच रणनीती गोव्यासाठी बनवली असती तर गोव्याला आणखी 15 वर्षे गुलामगिरी सहन करावी लागली नसती. तत्कालीन पंतप्रधानांना जगात आपली प्रतिमा डागाळण्याचा धोका होता, म्हणून त्यांनी गोव्याला 15 वर्षे गुलामगिरीत ठेवले. पंतप्रधान मोदी म्हणाले की, नेहरूंनी सत्याग्रहींना मदत करण्यास नकार दिला होता. ते म्हणाले की, पंडित नेहरू तेव्हा म्हणाले होते की, “आम्ही तिथे लष्करी कारवाई करू, या भ्रमात कोणीही राहू नये. गोव्याच्या आजूबाजूला सैन्य नाही. लोकांची इच्छा आहे की आपण तिथे सैन्य पाठवावे पण आम्ही तिथे सैन्य पाठवणार नाही. जे तिकडे जात आहेत, त्यांना तिथे जाण्यासाठी शुभेच्छा.”
आपल्या भाषणात पंतप्रधान मोदींनी स्वरकोकिळा, भारतरत्न स्व. लता मंगेशकर यांचाही उल्लेख केला. काँग्रेसवर निशाणा साधत ते म्हणाले, ‘लता मंगेशकर यांच्या कुटुंबीयांना कसे वागवले गेले? याचाही विचार करायला हवा. लताजींचे कुटुंब गोव्याचे होते. त्यांचे धाकटे भाऊ हृदयनाथ मंगेशकर यांना आकाशवाणीवरून काढून टाकण्यात आले कारण त्यांनी सावरकरांची एक कविता आकाशवाणीवर वाचली होती.’
यापूर्वी सोमवारी लोकसभेत केलेल्या भाषणात काँग्रेसवर निशाणा साधताना पीएम मोदींनी पंडित नेहरूंचा अनेकदा उल्लेख केला होता. पंतप्रधान म्हणाले होते, ‘काँग्रेस कर्तव्याच्या मुद्द्यावरून कंटाळली आहे, याचे मला आश्चर्य वाटते. ‘मोदीजी नेहरूजींचे नाव घेत नाहीत’ असे तुम्ही म्हणत राहता. कर्तव्यावर असताना पंडित नेहरू म्हणाले, ‘मला तुम्हाला सांगायचे आहे, हा स्वतंत्र हिंदुस्थान आहे. आपण स्वातंत्र्य साजरे करतो, पण स्वातंत्र्यासोबत जबाबदारी येते. महागाईच्या मुद्द्यावर पीएम मोदी म्हणाले, ‘पंडितजी लाल किल्ल्यावर काय म्हणाले होते… कधी-कधी कोरियातील लढाईचाही आपल्यावर परिणाम होतो, त्यामुळे वस्तूंची किंमत वाढते आणि ती आपल्या नियंत्रणाबाहेर जाते. पुढे म्हणतात. अमेरिकेतही काही घडले तर त्याचा परिणाम महागाईवरही होतो. त्या वेळेचाही विचार करा.’




























































