‘पीएनजी’ ची बदनामी प्रकरणात सायबर पोलिसांकडे तक्रार

पुणे शहरातील प्रसिद्ध पु. ना. गाडगीळ ज्वेलर्स प्रा. लि.चा कर्जासंदर्भातील फसवा मेसेज ठेवीदारांनी पाठवून सुवर्णभिशी योजनेतील ठेवी काढून घ्याव्यात, असा संदेश सोशल मीडियावर प्रसारित करणाऱ्या अज्ञाताविरोधात कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. याबाबत पु. ना. गाडगीळ ज्वेलर्स प्रा. लि. चे जनसंपर्क अधिकारी निलेश कोळपकर यांनी सायबर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

त्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार अज्ञाता विरोधात अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. पु. ना. गाडगीळचे मालक सौरभ गाडगीळ यांनी डीएचएफएलसी खासगी वित्तीय संस्थेचे कर्ज थकवले आहे. ठेवीदारांनी ठेवी काढून घ्याव्यात, असा संदेश सोशल मीडियावर प्रसारित करून बदनामी केली. या प्रकरणात कारवाईची मागणी कोळपकर यांनी तक्रारीत केली आहे. त्यानुसार अज्ञाता विरोधात अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. त्यानुसार सायबर पोलीस ठाण्याकडून तपास करण्यात येत आहे.

आपली प्रतिक्रिया द्या