
मुंबई पोलीस दलातील भरती प्रक्रियेदरम्यान झालेला आणखी एक झोल समोर आला आहे. लेखी परीक्षा खऱ्या उमेदवाराने, तर मैदानी चाचणी डमीने दिल्याचे समोर आले आहे. मैदानी चाचणीदरम्यान करण्यात आलेली व्हिडीओग्राफी आणि प्रत्यक्षातील फोटो यामध्ये तफावत आढळल्याने हा प्रकार उघडकीस आला. सतीश मोरे असे खऱ्या उमेदवाराचे तर कृष्णा मोरे असे डमी उमेदवाराचे नाव असून सतीश मोरे याला अटक करण्यात आली आहे.

























































