प्रियांका-निकचे लग्न ‘या’ महालात होणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
priyanka-and-nick

सामना ऑनलाईन। नवी दिल्ली

दीपिका -रणवीरच्या लग्नानंतर आता चर्चा आहे ती प्रियांका- निकच्या लग्नाची. हे जोडपं कुठे, कशा पद्धतीने लग्न करणार याबद्दल जाणून घेण्यासाठी त्यांचे चाहते उत्सुक आहेत. याचदरम्यान, प्रियांका- निक राजस्थानमधील उमेद भवन या महालात लग्न करणार असल्याचे समोर आले आहे. 1 आणि 2 डिसेंबरला हिंदुस्थानी पद्धतीने हे लग्न होणार आहे.

umed-bhavan

उमेद भवन हे त्याच्या राजकीय कार्यकिर्दीसाठी लोकप्रिय आहे. त्यामुळे पर्यटनाबरोबरच लग्नसोहळ्यासाठी हा महाल जगभरात प्रसिद्ध आहे. या महालाचे लग्नासाठीचे एका रात्रीचे भाडे 60,000 डॉलर म्हणजेच. 43,15, 500 रुपये एवढे आहे. लग्नाच्या पूर्वतयारीसाठी प्रियांका शुक्रवारी आईसोबत येथे आली होती. त्यांनी लग्नात येणाऱ्या जवळच्या व्यक्तींसाठी 65 खास रुम बुक केल्या. या रुमचे एका रात्रीचे भाडे 922 डॉलर म्हणजेच म्हणजे जवळजवळ 66 हजार रुपये आहे. 52 एकरमध्ये हा महाल व हॉटेल पसरले आहे. यात बाग, स्विमींग पूल, स्पा, मसाज रूम, आणि योगा रुमबरोबर अनेक सुविधा आहेत. या महालातील महाराणी या शाही रुममध्ये प्रियांका निकचा मुक्काम असणार आहे.

उमेद भवनाचे प्रवेशद्वार सर्वप्रथम 1942 साली उघडण्यात आले. तेव्हापासून जोधपूरचे राजघराण्याचे निवासस्थान म्हणूनही उमेद भवन ओळखले जाते.