
अभिनेत्री प्रियांका चोप्रा सोशल मीडियावर तिच्या ग्लॅमरस स्टाइलसाठी ओळखली जाते. ती अनेकदा तिचे थ्रोबॅक फोटोही शेअर करत असते. कधी हा फोटो त्याच्या लहानपणीचा असतो, तर कधी सिनेक्षेत्रातील सुरुवातीच्या दिवसांचा. प्रियांका चोप्राने आता तिचा 2000 सालचा एक फोटो शेअर केला आहे, ज्यामध्ये ती मालदीवमध्ये दिसत आहे.
प्रियांका चोप्राच्या या फोटोवर चाहत्यांपासून ते प्रसिद्ध सेलिब्रिटींपर्यंत अनेक कमेंट येत आहेत. यामध्ये प्रियांका चोप्राचा पती निक जोनसपासून अभिनेता रणवीर सिंगपर्यंतचा समावेश आहे. पण गमतीशीर गोष्ट म्हणजे रणवीर सिंगची ही कमेंट पाहून प्रियांका चोप्रानेही डोक्याला हात लावला.
View this post on Instagram
हा फोटो इंस्टाग्रामवर शेअर करत देसी गर्ल प्रियंका चोप्राने लिहिले, ‘नोव्हेंबर 2000. 18 वर्षांची मी.’ प्रियांकाच्या फोटोवर तिचा पती निक जोनासने आगीचा इमोजी बनवून कमेंट केली आहे. इतकंच नाही तर बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंगने यावर पंजाबी स्टाईलमध्ये ‘ब्रुहह’ लिहिलं आहे. ज्यावर प्रियंका चोप्राने हेड बँगिंग इमोजी पोस्ट केला आहे. अशातच रणवीर सिंगच्या या कमेंटवर अनेक प्रतिक्रिया येत आहेत.
प्रियांका चोप्राबद्दल बोलायचे झाले तर तिने नुकतेच Amazon Prime च्या ‘Citadel’ या मालिकेचे शूटिंग पूर्ण केले आहे. ती ‘द मॅट्रिक्स 4’ मध्येही दिसली आहे. बॉलिवूडमध्ये ती कतरिना कैफ आणि आलिया भट्टसोबत फरहान अख्तरच्या ‘जी ले जरा’ चित्रपटात दिसणार आहे. निक आणि प्रियांकाने 2018 साली लग्न केले आणि त्यांना एक मुलगीही आहे.





























































