मोठी बातमी: मनी लाँड्रिंग प्रकरणी दाखल आरोपपत्रात प्रियंका गांधींच्या नावाचा उल्लेख

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. शस्त्रास्त्रांचा व्यापार करणारा संजय भंडारी याच्याशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात सक्तवसुली संचालनालयाने (ED) दाखल केलेल्या आरोपपत्रात प्रियंका गांधी यांच्या नावाचा उल्लेख करण्यात आला आहे.

पण महत्त्वाचं म्हणजे तपास यंत्रणेनं आरोपपत्रात प्रियंकाचे पती रॉबर्ट वाड्रा यांच्या नावाचाही उल्लेख केला आहे.

आरोपपत्रानुसार प्रियंका गांधी यांना या प्रकरणात आरोपी ठरवण्यात आलेले नाही.

रॉबर्ट वड्रा आणि प्रियंका गांधी यांनी दिल्लीस्थित रिअल इस्टेट एजंटच्या माध्यमातून हरियाणातील जमीन खरेदी केली होती, ज्याने एनआरआय उद्योगपती सीसी थंपी यांनाही जमिनीचा एक तुकडा विकला होता, असा दावा आरोपपत्रात करण्यात आला आहे.

त्यात असेही म्हटलं आहे की वाड्रा आणि थंपी यांचे नातं ‘सामान्य आणि व्यावसायिक हितसंबंध’ पर्यंत आहे.