लोकसभा निवडणूक लढवणार का? वाचा प्रियंका गांधींनी काय दिलं उत्तर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । लखनौ

लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी उत्तर प्रदेशच्या दौऱ्यावर असलेल्या काँग्रेसच्या सरचिटणीस बुधवारी अमेठीमध्ये पोहोचल्या. येथे त्यांना लोकसभा निवडणूक लढवणार का असा प्रश्न प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधिंनी विचारला असता त्या म्हणाल्या की, पक्षाने जर तसा आदेश दिला तर नक्कीच निवडणूक लढवेल. त्यामुळे प्रियंका गांधी भविष्यात लोकसभा निवडणूक लढवणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत.

सुंदर प्रियंकांनी राजकारणाऐवजी चित्रपट क्षेत्रात जायला हवे होते; रिजवींचे वादग्रस्त वक्तव्य

तत्पूर्वी अमेठीमध्ये प्रियंका गांधी आणि काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांचे स्वागत करण्यात आले. येथे पत्रकारांनी त्यांना राजकारणात प्रवेश केल्यानंतर आता लोकसभा निवडणूक लढवणार का असा प्रश्न केला. याला उत्तर देताना प्रियंका गांधी म्हणाल्या की, मी अद्याप याबाबत विचार केलेला नाही. जर माझ्या पक्षाने मला निवडणूक लढण्यास सांगितले तर मी नक्कीच निवडणूक लढवेल. तसेच निवडणूक लढवण्यापेक्षा पक्षाचे काम करण्याची इच्छा असल्याच्याही त्या म्हणाल्या.

दरम्यान, प्रियंका गांधी यांनी यावेळी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावर निशाणा साधला. योगींनी राहुल आणि प्रियंकांवर निशाणा साधताना फक्त निवडणूक असतानाच दोघे मंदिरामध्ये जातात असे म्हटले होते. याला उत्तर देताना प्रियंका यांनी सवाल केला की, योगींना कसे माहिती की निवडणूक नसताना आम्ही मंदिरात जातो किंवा नाही?