
मुंबईकडे जाणाऱ्या ‘नंदिग्राम एक्स्प्रेस’मधील फर्स्ट एसी कोचमधील हनिमून सूट सजवल्याचा प्रकार उघडकीस येऊन आठवडा उलटण्याआधीच आता आणखी एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मुंबईकडे येणाऱ्या एका धावत्या ट्रेनमध्ये भटजी यांच्या उपस्थितीत पूजा-अर्चा केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या प्रकारानंतर रेल्वेकडून कारवाई करण्याऐवजी प्रवाशाने डबा आधीच बूक केला होता अशी सारवासारव केली आहे. यावर अनेक युजर्सने म्हटले की, ट्रेनमध्ये नमाजाचे पठन केल्यास भावना दुखावल्या जातात. ट्रेनच्या केबिनमध्ये हनिमूनचे सरप्राईज केल्यास संस्पृती धोक्यात येते आणि टीसीला सस्पेंड केले जाते, परंतु ज्या वेळी रेल्वेच्या एका व्हीआयपी सलून कोचमध्ये बेकायदा भटजींना बोलावून धावत्या ट्रेनमध्ये पूजा पाठ केले जाते, अशा कमेंट नेटकऱ्यांनी केल्या आहेत.



























































