पतसंस्थेतील कर्जवाटपात अनियमितता, 3 कोटी 42 लाखांचे नुकसान

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

खडकीतील अग्रसेन महाराज सहकारी पतसंस्थेकडून कर्जवाटप प्रक्रियेत पोटनियम बाह्य कर्ज वाटप करुन वसूल न करता तब्बल 3 कोटी 41 लाख 87 हजारांचे आर्थिंक नुकसान झाल्याप्रकरणी 10 संचालकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रमेश धरमचंद अग्रवाल, राजेश प्रेमचंद अग्रवाल, इंद्रकुमार पुरनमल बन्सल, संजय मामानचंद अग्रवाल, किसन कपुरचंद अग्रवाल, शशीकांत पुरुषोत्तम जगताप, मीना दीपक अग्रवाल, ज्योती नागेश यादव, स्नेहल सुयोग हरीप, कविता तानाजी सागावे अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी लेखा परिक्षक भगवंता नारायण बीडगर यांनी फिर्याद दिली आहे.

खडकीतील अग्रसेन महाराज सहकारी पतसंस्थेकडून कर्जवाटप प्रक्रियेत 2012 ते 2018 कालावधीत पोटनियम बाह्य कर्ज वाटप करुन वसूल न करता तब्बल 3 कोटी 41 लाख 87 हजारांचे नुकसान झाले आहे. याप्रकरणी संबंधित पतसंस्थेच्या चेअरमनसह 10 जणांविरुद्ध आर्थिक व सायबर विभागाने गुन्हा दाखल केला आहे.