माहेरून मोटार आणण्यासाठी पत्नीला उपाशी ठेवले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

लग्नानंतर माहेरहून सहा लाख रूपये रोख आणि पाच तोळे सोने आणण्यासाठी सासरच्या मंडळींनी सुनेचा छळ करून उपाशी ठेवल्याची धक्कादायक घटना उत्तमनगरमध्ये घडली आहे. याप्रकरणी पती, सासू, नणंदविरूद्ध उत्तमनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सिद्धार्थ विठ्ठल नागरगोजे (पती), अंजना विठ्ठल नागरगोजे (सासू), धनश्री उत्तम केंद्रे (नणंद), दीपाली सागर ढाकणे (नणंद), वैशाली मंगेश बडे (नणंद) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी नम्रता नागरगोजे यांनी फिर्याद दिली आहे.

नम्रता आणि सिद्धार्थ यांचे काही महिन्यांपुर्वी लग्न झाले होते. लग्नानंतर सासरच्या मंडळींनी नम्रता यांना चांगल्या पद्धतीने वागविले. त्यानंतर मोटार घेण्यासाठी माहेरहून 6 लाख रूपये रोख आणि 5 तोळे सोने घेउन येण्यास सांगितले. नाहीतर आमच्या इथे राहू नकोस असे सांगितले. त्यानंतर पती सिद्धार्थने नम्रताला उपाशी ठेउन लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली. त्यानंतर सासरच्या रोजच्या त्रासाला वंâटाळून नम्रताने आई-वडिलांना माहिती दिली. त्यानुसार तिच्या आई-वडिलांनी नम्रताच्या सासरच्या मंडळींना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांनी नम्रता यांना नांदविण्यास नकार दिला. याप्रकरणी उत्तमनगर पोलीस तपास करीत आहेत.